PM Modi Feeding Elephant Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Theppakadu Elephant Camp ला भेट; हत्तीला खाऊ घातला ऊस (Watch)
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक छायाचित्र समोर आले होते, ज्यामध्ये ते काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी-शर्ट, काळे शूज आणि गॉब्लेट स्लीव्हलेस जॅकेट घातलेले दिसत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी कर्नाटकच्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात पोहोचले, जिथे ते संरक्षणाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेल्या फ्रंटलाइन फील्ड स्टाफ आणि स्वयं-सहायता गटांशी संवाद साधणार आहेत. यावेळी पंतप्रधानांनी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्ती कॅम्पलाही भेट दिली. यावेळी ते हत्ती कॅम्पमधील माहूत आणि कवड्यांशी संवाद साधतील. व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांशीही ते संवाद साधणार आहेत. आता पीएम मोदींचा थेप्पाकडू हत्ती कॅम्पमधील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते हत्तीला ऊस खाऊ घालताना दिसत आहेत.
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक छायाचित्र समोर आले होते, ज्यामध्ये ते काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी-शर्ट, काळे शूज आणि गॉब्लेट स्लीव्हलेस जॅकेट घातलेले दिसत होते. (हेही वाचा: PM Modi Selfie With Handicap BJP Karyakarta: अपंग भाजप कार्यकर्त्यासोबत पंतप्रधान मोदींनी घेतली सेल्फी, पहा फोटो)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)