Watch: चार वर्षांच्या मुलीला भटक्या बैलाने दिली टक्कर; पायदळी तुडवले, प्रकृती चिंताजनक
टक्कर दिल्यानंतर या बैलाने मुलीला तुडवले. यामध्ये गंभीर जखमी मुलीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अलिगढमधील ठाणे गांधी पार्क परिसरातील धानीपूर मंडी येथे एका चार वर्षांच्या मुलीला भटक्या बैलाने टक्कर दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टक्कर दिल्यानंतर या बैलाने मुलीला तुडवले. यामध्ये गंभीर जखमी मुलीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात एक बैल मुलीला पायदळी तुडवताना दिसत आहे. पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, भटक्या बैलाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)