Viral Video: झाडावरून उंच उडी मारून बिबट्याने केली माकडाची शिकार, पाहा व्हिडिओ
भारतीय वन सेवेतील अधिकारी सुसंता नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात झाडांमध्ये बिबट्या माकडाचा पाठलाग करताना दाखवण्यात आले आहे. भारतीय वन सेवेतील अधिकारी सुसंता नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या क्लिपमध्ये बिबट्या माकडाच्या मागे धावताना दिसत आहे. तो झाडावर चढतो आणि मागे उडी मारून माकडाला पकडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर त्याला पकडता न आल्याने बिबट्या पुन्हा प्रयत्न करतो. यावेळी बिबट्याने झाडावरून झेप घेतल्यावर माकडाला पकडण्यात यश आले. पोस्टच्या कॅप्शनमध्ये, IFS सुसंता नंदा यांनी लिहिले की, "हेच कारण आहे की बिबट्याला सर्वात संधीसाधू आणि बहुमुखी शिकारी म्हणून ओळखले जाते."
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)