Satish Kaushik Death Case: दिल्ली पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर विकास मालूच्या पत्नीची तपास अधिकारी बदलण्याची मागणी

दिल्ली पोलीस सध्या अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सतीश कौशिक यांचा मित्र विकास मालूची दुसरी पत्नी सान्वी हिला पुन्हा चौकशीत सहभागी होण्यासाठी समन्स पाठवले आहे.

Satish Kaushik (PC - Instagram)

जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ज्या होळी पार्टीत हजेरी लावल्यानंतर सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं, त्या फार्म हाऊसच्या मालकावर त्याच्याच पत्नीने आरोप केले होते. दिल्ली पोलीस सध्या अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सतीश कौशिक यांचा मित्र विकास मालूची (Vikas Malu) दुसरी पत्नी सान्वी (Sanvi Malu) हिला पुन्हा चौकशीत सहभागी होण्यासाठी समन्स पाठवले आहे. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी सान्वीला चौकशीसाठी बोलावल्यानंतर सान्वीने पोलिसांवर आरोप केला आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement