Video: भरधाव स्कॉर्पिओ कारने दुचाकला उडवले, एक ठार, एक जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

अजित कुमार असे मृताचे नाव असून, छोटू ठाकूर असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. अपघात एवढा भीषण होता की, धडकल्यानंतर दोन्ही दुचाकीस्वार हवेत उडाले. गंभीर जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Scorpio Car Hits Men

दुचाकी आणि स्कॉर्पिओ यांच्यात झालेल्या थेट धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना सिकंदरा मुख्य मार्गावरील लगमा कालव्याजवळ गुरुवारी दुपारी घडली. अजित कुमार असे मृताचे नाव असून, छोटू ठाकूर असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. अपघात एवढा भीषण होता की, धडकल्यानंतर दोन्ही दुचाकीस्वार हवेत उडाले. गंभीर जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात सिकंदरा येथून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ दुचाकीला धडकताना दिसत आहे. घटनेनंतर स्कॉर्पिओचा चालक वाहनासह फरार झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement