Uttarakhand To Implement Uniform Civil Code: उत्तराखंड विधानसभेत यूसीसी विधेयक मंजूर; ठरले समान नागरिक संहिता लागू करणारे पहिले राज्य

भाजपच्या सर्व आमदारांनी आवाजी मतदानाने यूसीसी विधेयक मंजूर केले. हा प्रस्ताव 80 टक्के संमतीने मंजूर करण्यात आला. त्यानंतर सर्व सदस्यांनी सभागृहात जय श्री रामचा जयघोष केला.

CM Pushkar Singh Dhami

Uttarakhand To Implement Uniform Civil Code: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेले समान नागरी संहिता (UCC) विधेयक सभागृहात मंजूर करण्यात आले. उत्तराखंड विधानसभेत यूसीसी विधेयक मंजूर झाल्यानंतर, उत्तराखंड समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. भाजपच्या सर्व आमदारांनी आवाजी मतदानाने यूसीसी विधेयक मंजूर केले. हा प्रस्ताव 80 टक्के संमतीने मंजूर करण्यात आला. त्यानंतर सर्व सदस्यांनी सभागृहात जय श्री रामचा जयघोष केला. या विधेयकात केवळ विवाह, घटस्फोट, वारसा आणि दत्तक या विषयांचा समावेश आहे. या विषयांवर केलेल्या तरतुदींमध्ये, विशेषत: विवाह प्रक्रियेत, जात, धर्म किंवा पंथाच्या परंपरा आणि चालीरीतींशी छेडछाड केलेली नाही. या विधेयकातील तरतुदीनुसार, मालमत्तेत मुलगा आणि मुलगी यांना समान अधिकार देण्यात आले आहेत आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जन्मलेल्या मुलांनाही मालमत्तेचा हक्क देण्यात आला आहे. अनुसूचित जमाती समाजातील लोकांना यूसीसी लागू होणार नाही. (हेही वाचा: Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींनी ओडिशाच्या राउरकेला येथील वेदव्यास मंदिरात केली प्रार्थना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now