Uttarakhand: लष्करी सरावादरम्यान Indian Army व US Army ने हिमालयात आयोजित केला रॉक कॉन्सर्ट; सैनिक दिसले गिटार व ड्रम वाजवताना (Watch Video)
युद्ध अभ्यासाच्या 18 व्या आवृत्तीदरम्यान दोन्ही देशांच्या आर्मीने हिमालयात एक रॉक कॉन्सर्ट आयोजित केला होता.
उत्तराखंडमधील औली येथे भारत-अमेरिकन सैन्याचा दोन आठवड्यांचा लष्करी सराव सुरू आहे. सुमारे साडेनऊ हजार फूट उंचीवर हा संयुक्त सराव सुरू आहे. औलीच्या या युद्धाभ्यासानंतर जगाला कळेल की, भारतीय लष्कर उंचावर म्हणजे बर्फाच्छादित टेकड्या आणि थंडीतील युद्धात सक्षम आहे. या युद्ध अभ्यासाच्या 18 व्या आवृत्तीदरम्यान दोन्ही देशांच्या आर्मीने हिमालयात एक रॉक कॉन्सर्ट आयोजित केला होता. यावेळी सैनिक गिटार तसेच ड्रम वाजवताना दिसले. अशा प्रकारे भारतीय लष्कर आणि यूएस आर्मीच्या जवानांचा LAC जवळ त्यांच्या संयुक्त लष्करी कवायतीदरम्यान काही हलके-फुलके क्षण व्यतीत केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.