Uttar Pradesh Shocker: रंग लावण्याच्या बहाण्याने शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; झाली अटक, गुहा दाखल (Disturbing Video)
आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) आणि POCSO कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिर्झापूर जिल्ह्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ होळीच्या वेळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. रंग लावण्याच्या बहाण्याने शिक्षक विद्यार्थिनीचा विनयभंग करत असताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. एक विद्यार्थिनी त्याला असे करण्यापासून रोखत आहे, मात्र तरीही शिक्षक मुलीला रंग लावण्याची जबरदस्ती करत आहे. एका विद्यार्थ्याने घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. यासंदर्भात आयटीआयचे प्राचार्य पी.के.शक्यवार म्हणाले की, आरोपीवर कारवाई केली जाईल. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संचालकांकडे पाठवला जात आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) आणि POCSO कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: Sex On Giant Wheel Ride: जोडप्याने आकाश पाळण्यात केले Sex, पुढे घडला धक्कादायक प्रकार)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)