Uttar Pradesh Shocker: लखीमपुर येथे भरधाव कारने सायकलस्वाराला चिरडले; व्यक्तीचा जागीच मृत्यू, समोर आला धक्कादायक व्हिडीओ (Watch)
हा अपघात निघासन येथील पालिया राज्य महामार्गावर झाला.
लखीमपूर येथे एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. या ठिकाणी एका भरधाव कारने सायकलस्वाराला चिरडले, ज्यामध्ये सायकलस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर सायकलस्वाराला तसेच सोडून कार चालक फरार झाला. अपघाताचे संपूर्ण चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही व्यक्ती बाजार आणण्यासाठी घरून निघाली होती, जेव्हा त्याला एका कारने जोरात धडक दिली. हा अपघात निघासन येथील पालिया राज्य महामार्गावर झाला. (हेही वाचा: Haryana Shocker: पन्नास रुपये चोरल्याचा आरोप, बाऊन्सरच्या मारहाणीत टोल कर्मचाऱ्याचा मृत्यू, हरियाणा राज्यातील घटना)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)