UPI Transactions Crosses 10 Billion Mark: भारतातील युपीआय व्यवहारांनी ऑगस्टमध्ये प्रथमच पार केला 10 अब्जांचा टप्पा
जाहीर झालेल्या 30 ऑगस्टपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, युपीआय व्यवहारांची संख्या 10.241 अब्ज झाली आहे.
युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) साठी ऑगस्ट महिना मैलाचा दगड ठरला. ऑगस्टमध्ये युपीआय व्यवहारांचा आकडा 10 अब्जांच्या पुढे गेला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ऑगस्टमध्ये युपीआयद्वारे 15.76 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले. जाहीर झालेल्या 30 ऑगस्टपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, युपीआय व्यवहारांची संख्या 10.241 अब्ज झाली आहे. मूल्याच्या बाबतीत, युपीआयद्वारे 15.18 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. जुलैमध्ये युपीआय व्यवहारांची संख्या 9.96 अब्ज होती, तर जूनमध्ये ती 9.33 अब्ज होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा व्यवहारात 61 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी व्यवहाराच्या रकमेत 47 टक्के वाढ झाली आहे. (हेही वाचा: TIME ने जाहीर केली जगातील सर्वोत्तम कंपन्यांची यादी; Infosys टॉप 100 मध्ये, Wipro आणि Mahindra कितव्या क्रमांकावर? जाणून घ्या)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)