Paytm, Google Pay, Phonepe यांसारख्या UPI पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, सरकारने म्हटले- यामुळे अर्थव्यवस्थेला होत आहे फायदा
सरकार UPI सेवांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्याचा विचार करत नाही.
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे केलेल्या पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारण्याचा कोणताही हेतू नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मीडियामध्ये अशा बातम्या होत्या की, RBI एक नवीन प्रस्ताव अनु शकते, ज्या अंतर्गत UPI पेमेंट करण्यासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारले जाईल. म्हणजेच हे पेमेंट पूर्णपणे मोफत असणार नाही. यावर स्पष्टीकरण देताना, अर्थ मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, सरकार UPI सेवांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्याचा विचार करत नाही. UPI सेवेचा भारतीय अर्थव्यवस्थेला खूप फायदा होत असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. UPI पेमेंट भारतात खूप लोकप्रिय झाले आहे आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे शुल्क लादल्यास डिजिटल पेमेंट सिस्टमला मोठा धक्का बसेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement