UP Shocker: रस्त्यावर झाडाच्या सावलीला झोपलेल्या व्यक्तीस कारने चिरडले; Video Viral

उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथील एका घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत आपण पाहू शकता की, रस्त्यावर एका कडेला झाडाच्या सावलीत झोपलेल्या एका व्यक्तीला कारने चिरडले आहे.

UP Shocker | (PC - Twitter)

उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथील एका घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत आपण पाहू शकता की, रस्त्यावर एका कडेला झाडाच्या सावलीत झोपलेल्या एका व्यक्तीला कारने चिरडले आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना 1 ऑगस्ट रोजी गोविंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. अधिक माहिती अशी की मोहन असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. तो कचरा गोळा करुन उदरनिर्वाह करत असे. दरम्यान, घटनास्थळावरुन कारचालकाने कारसह पलायन केले आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now