UP Shocker: मेरठमध्ये पोलीस चौकीत एका व्यक्तीचा बेदम मारहाणीनंतर मृत्यू; तिघांना अटक (पहा व्हिडिओ)

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री पोलीस चौकीत 50 वर्षीय कापड व्यापारी आबिद मोहम्मद याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले.

Crime (PC- File Image)

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री पोलीस चौकीत 50 वर्षीय कापड व्यापारी आबिद मोहम्मद याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. घटनेच्या वेळी पोलीस उपस्थित होते. नुकतीच बायपास शस्त्रक्रिया केलेल्या मोहम्मदला हल्ल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याचे समजते. त्याच्या मृत्यूनंतर, मोहम्मदच्या कुटुंबीयांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पाच तासांहून अधिक काळ धरणे धरले आणि पोलिसांना सहा जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (Murder) अंतर्गत प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यास भाग पाडले. यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून उर्वरित संशयितांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement