UP Shocker: जुगारात हरल्यानंतर पतीने पत्नीला ठेवले गहाण; महिलेच्या भावाने येऊन वाचवली लाज, गुन्हा दाखल
आरोपानुसार, महिलेचा पती दिल्लीत जुगारात बरेच पैसे हरला व त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला गहाण ठेवले. महिलेच्या भावाने तिची तिथून सुटका केली.
महाभारतामध्ये पांडवांनी द्रौपदीला पणाला लावले होते, त्यानंतर श्रीकृष्णाने तिचे रक्षण केले. आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथे समोर आली आहे. या ठिकाणी जुगार खेळताना पैसे संपल्याने एका पतीने आपल्या पत्नीला गहाण ठेवले. महिलेच्या पालकांना हा प्रकार समजतातच त्यांनी दिल्ली गाठून आपल्या मुलीची सुटका केली. घटनेनंतर पीडितेने पोलीस अधीक्षकांना तक्रार पत्र दिले होते, ज्याच्या आधारे तिच्या पतीसह सासरच्या 9 लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महिलेचा आरोप आहे की, लग्नानंतर तिच्याकडे सतत पैशांची मागणी केली जात होती. हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.
आरोपानुसार, महिलेचा पती दिल्लीत जुगारात बरेच पैसे हरला व त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला गहाण ठेवले. महिलेच्या भावाने तिची तिथून सुटका केली. त्यानंतरही सासरच्या लोकांनी महिलेला घरी घेतले नाही. ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या वडिलांसोबत तिच्या माहेरच्या घरी राहत होती. आता या महिलेच्या तक्रारीवरून एसपी अमरोहा कुंवर अनुपम सिंह यांनी एफआयआर नोंदवला असून कारवाईचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा: Uttar Pradesh Shocker: दुकानात स्टूलवर बसल्याबद्दल अल्पवयीन मुलाला अमाणुषपणे मारहाण, घटना CCTV कैद)