UP Shocker: उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये चार वर्षांच्या मुलीवर 14 वर्षांच्या मुलाचा बलात्कार; आरोपीला अटक, बालसुधारगृहात पाठवले

सोमवारी संध्याकाळी ही मुलगी शेळ्या चारत होती, तेव्हा त्याच गावातील एका अल्पवयीन मुलाने तिच्यावर बलात्कार केला आणि पळून गेला.

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूर परिसरात एका 14 वर्षांच्या मुलाला चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. देवरियाचे एसपी संकल्प शर्मा यांनी सांगितले की, ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. सोमवारी संध्याकाळी ही मुलगी शेळ्या चारत होती, तेव्हा त्याच गावातील एका अल्पवयीन मुलाने तिच्यावर बलात्कार केला आणि पळून गेला. मुलीची वाईट स्थिती पाहून कुटुंबीयांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि तिला गौरीबाजार येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, तेथून तिला देवरिया येथील महर्षी देवराह बाबा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. शर्मा म्हणाले की, पोलिसांनी आरोपी मुलाला मंगळवारी ताब्यात घेतले आणि कायदेशीर कारवाईनंतर त्याला बालसुधारगृहात पाठवले. (हेही वाचा: Thane Shocker: पोटच्या लेकीवर बापाचा बलात्कार; पोलिसांत गुन्हा दाखल होताच रेल्वे समोर उडी मारत आत्महत्या)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement