UP Shocker: गरम खिरीच्या भांड्यात पडून पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू; छठपूजेच्या मेजवानीवेळी घडली घटना

कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर काव्याची प्रकृती चिंताजनक पाहून तिला पडरौना येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले,

Death | Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावात गरम खिरीच्या भांड्यात पडून पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार मंगळवारी अशोक यादव यांच्या घरी छठपूजेच्या वेळी ही घटना घडली. कुटुंब मेजवानीची तयारी करत होते. जेवणासाठी अनेकांना निमंत्रित करण्यात आले होते. एका मोठ्या कढई खीर शिजत होती. त्याचवेळी शेजारी खेळत असलेली मुलगी खीर शिजत असलेल्या मोठ्या भांड्यात पडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर काव्याची प्रकृती चिंताजनक पाहून तिला पडरौना येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले, मात्र जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निष्पाप काव्याचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. (हेही वाचा: Uttar Pradesh Shocker: गोरखपूर मध्ये छठपूजा करून परतणार्‍या दहावी मधील मुलीवर सामुहिक बलात्कार; 2 जण अटकेत)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement