UP Shocker: या प्रकरणात नराधमाने सुरूवातीला तरूणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर, तरूणीच्या ईच्छे विरुद्ध तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान, तरूणी गरोदर झाली. बाळ नको म्हणून आरोपीने तिला औषधे घेण्यासाठी फोर्स केले. त्याला तरूणीने नकार दर्शवला. त्यामुळे अखेर तरूणाने रागात तिला थेट ॲसिड(acid) पाजले. परिणामी तरूणी गंभीर जखमी झाली. तिला लखनऊच्या केजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारा(treatment)दरम्यान पीडितेचा मृत्यू (Death) झाला. हे प्रकरण पीलीभीतच्या पुरनपूर कोतवाली परिसरातील आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (हेही वाचा :Dombivali Crime: डोंबिवलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)