Amrit Bharat Train Inside Video: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून अमृत भारत ट्रेनची पाहणी (Watch Video)
अमृत भारत ट्रेनला लवकरच हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दाखविण्यात येणार असल्याचे माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी वैष्णव यांनी अमृत भारत ट्रेनची पाहणी केली. त्यांनी ट्रेनमधील तांत्रिक गोष्टी समजून घेतल्या.
अमृत भारत ट्रेनला लवकरच हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दाखविण्यात येणार असल्याचे माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी वैष्णव यांनी अमृत भारत ट्रेनची पाहणी केली. त्यांनी ट्रेनमधील तांत्रिक गोष्टी समजून घेतल्या. त्यांचा दावा आहे की ट्रेनचा वेग तसेच प्रवाशांच्या आरामात लक्षणीय वाढ नव्या तंत्रज्ञानामुळे पाहायला मिळत आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अमृत भारत ट्रेनचा वेग अधिक वाढला आहे. ही गाडी लवकर वेग घेते आणि त्वरीत थांबते, त्यामुळे वाटेत जेथे वक्र आणि पूल असतील तेथे वेळेची बचत होते. प्रवाशांच्या सोईसाठी प्रत्येक सीटजवळ चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत. रुंद दरवाजे आणि विशेष रॅम्पसह दिव्यांगांसाठी खास शौचालयेही बनवण्यात आली आहेत, असेही वैष्णव म्हणाले. (हेही वाचा, Bihar Shocker: बिहारमधील बाढ स्थानकावर आई आणि मुलांवरून गेली ट्रेन, थोडक्यात जीव वाचला (Watch Video))
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)