Telangana Assembly Elections: गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा केला प्रसिद्ध

गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ही मोदींची हमी आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात तेलंगणातील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला चार मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे.

भारतीय जनता पक्षाने आज तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात धर्माच्या आधारे आरक्षण रद्द करणे, समान नागरी कायदा लागू करणे, तसेच ज्येष्ठ नागरिकांना रामलल्लाचे मोफत दर्शन देणे यासह अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. जाहीरनामा प्रसिद्ध करताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ही मोदींची हमी आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात तेलंगणातील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला चार मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement