Union Budget 2024: अर्थसंकल्प रोजगाराच्या संधींच्या नव्या युगाची सुरुवात करेल; गृहमंत्री अमित शाह

अर्थसंकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधील देशाचे उद्देश आणि आशावादाचे केवळ उदाहरणच देत नाही तर त्यांना बळकटी देते असे गृहमंत्री अमित शाह यांनी आज सादर झालेल्याा बजेटवर प्रतिक्रीया देताना म्हटले.

Union Budget 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah)यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया देताना म्हटले की, '2024-25 चा अर्थसंकल्प रोजगार आणि संधींच्या नवीन युगाची सुरुवात करेल. भारताला विकसित राष्ट्र म्हणून उदयास येण्याच्या मार्गावर देशाच्या गतीला चालना देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधील देशाच्या उद्दिष्ट, आशा आणि आशावादाच्या नव्या भावनांचे उदाहरण हे बजेटच नाही तर त्यांना बळकटही करते', असे अमित शाह म्हणाले. (हेही वाचा:PM Modi on Union Budget 2024: 'देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारे बजेट'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रीया )

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)