Union Budget 2024 Live Streaming: अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग सातव्यांदा मांडणार अर्थसंकल्प; इथे पहा मोदी सरकार 3.0 चं पहिलं बजेट!
हा अर्थसंकल्प टेलिव्हिजन प्रमाणेच युट्यूब चॅनेल वरही पाहता येणार आहे.
मोदी सरकार 3.0 सत्तेमध्ये आल्यानंतर आज पहिलं पूर्ण बजेट लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता अर्थमंत्र्यांकडून याचं वाचन सुरू होणार आहे. हा अर्थसंकल्प टेलिव्हिजन प्रमाणेच युट्यूब चॅनेल वरही पाहता येणार आहे. निर्मला सीतारामन आज दिवंगत मोरारजी देसाई यांच्या सलग सहा वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोडीत काढणार आहेत. दरम्यान आजच्या बजेट मध्ये सामान्यांना काय मिळणार याची उत्सुकता वाढली आहे. Nirmala Sitharaman on Economic Survey: आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन उज्ज्वल, 6.5-7 टक्के वाढ अपेक्षित; निर्मला सितारामन यांची माहिती.
इथे पहा अर्थसंकल्प 2024
इथे पहा मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)