High Court: बेकायदेशीर पध्दतीने नजरकैदेत ठेवलेल्या दोन महिलांना 5 लाखांची नुकसान भरपाई, उच्च न्यायालयाचे आदेश

बेकायदेशीर पध्दतीने नजरकैदेत ठेवलेल्या दोन महिलांना 5 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायलयाने दिले आहेत.

Court | (Photo Credits-File Photo)

अवैधरीत्या मालाची खरेदी विक्री करण्याचा दोन महिलांवर आरोप होता. जिल्ह्या न्यायालयात हे प्रकरण दाखल झालं होतं. तरी या प्रकरणी जिल्हा न्यायाधिशांनी या महिला अवैधरीत्या अवैध मालाची खरेदी विक्री करतात असा निर्णय दिला. या निर्णयानुसार महिलांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आले होते. या निर्णया दरम्यान या दोन्ही महिलां विरोधात आवश्यक ते पुरावे नव्हते. पण निर्णयाच्या पाच महिन्यानंतर सल्लागार मंडळाने पुरावे सादर न केल्याने या दोन्ही महिलांन विरोधात दिलेला आदेश रद्द करण्यात आला. तसेच बेकायदेशीर पध्दतीने नजरकैदेत ठेवलेल्या दोन महिलांना 5 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायलयाने (Madras High Court) दिले.