Indore- Jabalpur Overnight Express derailed in Jabalpur: जबलपूर मध्ये इंदौर-जबलपूर एक्सप्रेसचे दोन डब्बे रूळावरून घसरले; सारे प्रवासी सुरक्षित

इंदौर-जबलपूर एक्सप्रेसचे दोन डब्बे रूळावरून घसरल्याच्या दुर्घटनेत कोणीही प्रवासी जखमी नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Jabalpur railway station | X @ANI

जबलपूर मध्ये इंदौर-जबलपूर एक्सप्रेसचे दोन डब्बे रूळावरून घसरल्याची दुर्घटना झाली आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सारे प्रवासी सुरक्षित आहेत. हा अपघात सकाळी 5.50 च्या सुमारास झाला आहे. प्लॅटफॉर्म पासून सुमारे 150 मीटर दूर हा अपघात झाला आहे अशी माहिती मध्य रेल्वेच्या CPRO ने दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)