नाशिकच्या सिन्नरमध्ये अंगावर काटा आणणारा अपघात: ब्रिजवरून खाली कोसळला ट्रक, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी बायपासवर उड्डाणपुलावरून एक सुसाट ट्रक थेट ५० फूट खाली रस्त्यावर कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघाताचे थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी बायपास उड्डाणपुलावर रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला. वेगाने जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक सुरक्षा कठडे तोडून थेट ५० फूट खाली कोसळला. या अपघाताचे थरारक दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सुदैवाने, ट्रक खाली कोसळला त्या वेळी खालील रस्त्यावरून कोणतेही वाहन किंवा नागरिक जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement