Telangana Stray Dogs Killing: तेलंगणात सुमारे 70 भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याचा आरोप, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

मात्र, हत्येमागे या आरोपींचा हेतू काय होता, हे अद्याप समजू शकलेले नाही.

Stray Dog

तेलंगणात एक धक्कादायक घटना घडली आहे. तेलंगणात 70 भटक्या कुत्र्यांना विषार इंजेक्शन देऊन मारण्यात आले आहे. तेलंगणा पोलिसांनी आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून आरोपींच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आले आहे. कुत्र्यांना मारल्याप्रकरणी निजामाबादच्या आरमुर येथील माचेर्ला गावातील सरपंच, ग्रामसचिव आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याची कलमे लागू करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 15-16 फेब्रुवारी रोजी घडली. मात्र, हत्येमागे या आरोपींचा हेतू काय होता, हे अद्याप समजू शकलेले नाही.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)