Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशात भरधाव कारची झाडाला धडक, 5 जणांचा मृत्यू
एका अधिकाऱ्याच्या नातेवाईकाचा वाढदिवस साजरा करून परतत होते. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृतांचे मृतदेह पीएमसाठी पाली येथे ठेवण्यात आले आहेत.
शहडोल उमरिया महामार्गावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. माझगंवाजवळ भरधाव वेगाने जाणारी इनोव्हा झाडावर आदळल्याने पाच जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये शहडोल जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शहडोल उमरिया महामार्गावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. माझगंवाजवळ भरधाव वेगाने जाणारी इनोव्हा झाडावर आदळल्याने पाच जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये शहडोल जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये शहडोल जिल्ह्याचे सार्वजनिक सेवा व्यवस्थापक अवनीश दुबे, खनिज निरीक्षक पुष्पेंद्र त्रिपाठी, गोहपरू जिल्ह्यात तैनात मनरेगा अभियंता आणि इतर दोघांचा मृत्यू झाला आहे. हे लोक रीवा येथून एका अधिकाऱ्याच्या नातेवाईकाचा वाढदिवस साजरा करून परतत होते. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृतांचे मृतदेह पीएमसाठी पाली येथे ठेवण्यात आले आहेत.