Tomato Price Hike: टोमॅटोवरून वाद झाल्यानंतर पतीला सोडून गेलेली पत्नी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परतली (Watch Video)
माहितीनुसार, पती आणि त्याच्या पत्नीमध्ये सहा दिवसांपूर्वी टोमॅटोवरून वाद सुरू झाला होता. परिस्थिती बिघडत गेली आणि महिलेने तिच्या पतीला सोडण्याचा निर्णय घेतला.
सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत, याचा परिणाम अनेकांच्या स्वयंपाकघरावर झाला आहे. अशात मध्य प्रदेशच्या शहडोलमध्ये नवरा जेवण बनवताना टोमॅटो वापरतो म्हणून त्याची बायको त्याला सोडून गेल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर नवऱ्याने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर नवरा-बायकोमधील भांडण मिटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. आता माहितीनुसार, नवऱ्याला सोडून गेलेली पत्नी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परतली आहे. पत्नी परत घरी आल्यावर नवरा म्हणतो, ‘ही माझी चूक होती, आता मी माझी बायको म्हणेल ते ऐकेन आणि तसेच वागेन.’ मिळालेल्या माहितीनुसार, पती आणि त्याच्या पत्नीमध्ये सहा दिवसांपूर्वी टोमॅटोवरून वाद सुरू झाला होता. परिस्थिती बिघडत गेली आणि महिलेने तिच्या पतीला सोडण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या मुलीसह पतीचे घर सोडले होते. यामागे फक्त नवरा जेवणात टोमॅटो वापरतो हे कारण होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)