Texas Mall Shooting: अमेरिकेच्या टेक्सास येथील मॉल मध्ये गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एका भारतीयाचा समावेश; हैदराबादची इंजिनियर Aishwarya Thatikonda चं निधन

अमेरिकेत गोळीबारात ठार झालेल्या आठ जणांपैकी Aishwarya Thatikonda या 27 वर्षीय तेलुगू मुलीचा समावेश आहे.

Aishwarya Thatikonda | Twitter

7 मे दिवशी टेक्सासमधील Allen Premium Outlets मध्ये झालेल्या गोळीबारात शूटरसह नऊ जणांचा मृत्यू झाला होता. राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये काही अल्पवयीन मुलांचा समावेश होता. मीडीया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी टेक्सास मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात ठार झालेल्या आठ जणांपैकी Aishwarya Thatikonda या 27 वर्षीय तेलुगू मुलीचा समावेश आहे. भारतातील हैदराबादची राहणारी ऐश्वर्या ही इंजिनियर होती, जी टेक्सासमधील खाजगी व्यवसायासाठी प्रोजेक्ट मॅनेज करत होती. Texas Accident: टेक्सासमध्ये गर्दीत गाडी घुसल्याने 7 जणांचा मृत्यू, कारचालकाला अटक .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now