All About Telecommunication Bill 2023: लोकसभेत टेलिकम्युनिकेशन बिल सादर; सरकारला आता 'राष्ट्रीय सुरक्षे'खाली टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस निलंबित, प्रतिबंधित करण्याची मुभा
आता ओटीटी किंवा इंटरनेट बेस्ड कॉलिंग आणि मेसेजिंग अॅप्सला देखील telecommunications च्या व्याख्येत समाविष्ट करण्यात आले असून यामुळे आता युजर्सची सुरक्षा अधिक बळकट होणार आहे.
लोकसभेमध्ये आज Telecommunication Bill 2023 मांडण्यात आले आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून हे बिल सादर करण्यात आले आहे. या बिलानुसार आता National Security अंतर्गत आता सरकार उपकरणांचा वापर निलंबित, प्रतिबंधित करू शकते. हे विधेयक आता 1885 चा टेलीग्राफ अॅक्टची जागा घेणार आहे. या विधेयकाला मंत्रिमंडळाची ऑगस्ट महिन्यातच परवानगी मिळाली होती. याद्वारा आता ओटीटी किंवा इंटरनेट बेस्ड कॉलिंग आणि मेसेजिंग अॅप्सला देखील telecommunications च्या व्याख्येत समाविष्ट करण्यात आले असून यामुळे आता युजर्सची सुरक्षा अधिक बळकट होणार आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)