Telangana Shocker: हैदराबादमध्ये क्रिकेट खेळत असताना Cardiac Arrest मुळे सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू
या 32 वर्षीय अभियंत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा संशय आहे.
हैदराबादमध्ये (Hyderabad) बुधवारी क्रिकेट (Cricket) खेळताना एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला. ही घटना सायबराबाद पोलीस आयुक्तालयाच्या राजेंद्र नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातचा रहिवासी असलेला तुषार सन सिटी एसबीआय मैदानावर क्रिकेट खेळत असताना खाली पडला. स्थानिक लोकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या 32 वर्षीय अभियंत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा संशय आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तुषार हैदराबादमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)