TCS Placements: TCS ची मोठी घोषणा, 40 हजार फ्रेशर्सना कंपनी देणार नोकरी

कंपनी 2023-24 या आर्थिक वर्षात तब्बल 40 हजार फ्रेशर्सना कामावर घेण्याची योजना आखत आहे.

TCS

जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी आर्थिक मंदीमुळे नोकरकपात सुरु केली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं आहे. आता नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी देशातील सर्वात मोठी आयटी एक्सपोर्टर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी (HR Head) मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, कंपनी 2023-24 या आर्थिक वर्षात तब्बल 40 हजार फ्रेशर्सना कामावर घेण्याची योजना आखत आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक फ्रेशर्सना नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने 44 हजार फ्रेशर्सना कामावर घेतले. याशिवाय अनुभवी व्यावसायिकांची विक्रमी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की, ऑफर केलेल्या सर्व फ्रेशर्सना कंपनीकडून नक्की नोकरी मिळेल. सध्या अनेक कंपन्याकडून कर्मचारी कपात ही केली जात आहे. त्यामुळे अनेकांमध्ये चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये नेट आधारावर 22 हजार 600 हेडकाऊंट वाढला असून आता तो एकूण 6 लाख 14 हजार 796 एवढा झाला आहे. कंपनीने 53 हजारांहून अधिक क्लाउड प्रमाणपत्रांचा आकडा ओलांडल्याचे सांगितले. तर ऑर्गेनिक टॅलेंट डेवलपमेंटचा एकूण आकडा 1 लाख 10 हजारांच्या पुढे गेला आहे.