Tamil Nadu: दोन दरुणांना विवस्त्र करुन मारहाण, अंगावर मुत्रविसर्जन; सहा जणांना अटक
तामिळनाडू राज्यातील एका जिल्ह्यात दोन तरुणांना विवस्त्र करुन बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच, आरोपींकडून पीडितांच्या अंगावर मूत्रविसर्जन करण्यात आल्याचेही वृत्त आहे. पीडित हे अनुसुचीत जातीतील असल्याचे सांगितले जात आहे.
तामिळनाडू राज्यातील एका जिल्ह्यात दोन तरुणांना विवस्त्र करुन बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच, आरोपींकडून पीडितांच्या अंगावर मूत्रविसर्जन करण्यात आल्याचेही वृत्त आहे. पीडित हे अनुसुचीत जातीतील असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहाजनांना अटक करण्यात आल्याची माहिती थचनलूर पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थमिरबरानी नदीतून आंघोळ करून परतणाऱ्या तरुणांसोबत घडली. आरोपींवर एससी/एसटी अत्याचार कायद्यासह आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेले, सर्व 21 ते 25 वयोगटातील आहेत. हे कृत्य केले तेव्हा आरोपी दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पीडितांनी म्हटले आहे की, आरोपींनी त्यांना जात विचारली. जी सांगण्यास पीडितांनी नकार देताच त्यांना मारहाण करण्यात आली. (हेही वाचा, Delhi News: मद्यधुंद तरूणाचा निर्लजपणा, वृध्द जोडप्यांच्या अंगावर केली लघवी, दिल्लीतील क्रांती एस्क्प्रेसमधील घटना)
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)