Taj Express Train Fire: दिल्लीजवळ ताज एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, सर्व प्रवासी सुरक्षित (Watch Video)

सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

Taj Express Train Fire

Taj Express Train Fire: दिल्लीतील सरिता विहार पोलीस स्टेशनजवळ ताज एक्सप्रेसच्या चार बोगींना आग लागली. पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. याबाबत उत्तर रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले की, तुघलकाबाद-ओखला दरम्यान ताज एक्सप्रेसच्या दोन बोगींना आग लागली. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. डीसीपी रेल्वेनुसार, एकूण 6 अग्निशमन दल घटनास्थळी पाठवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही व्यक्तीला कोणतीही दुखापत किंवा नुकसान झाले नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना 4.24 वाजता ताज एक्सप्रेस ट्रेनच्या चार डब्यांना आग लागल्याचा फोन आला. त्यानंतर ताबडतोब घटनास्थळी मदत पाठवण्यात आली. (हेही वाचा: Rajgarh Road Accident: राजस्थान राजगड बॉर्डरवर भीषण अपघात, लग्नातील पाहुण्यांना घेऊन जाणारा ट्रक उलटला, 13 जणांचा मृत्यू)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)