Swiggy CTO Dale Vaz Resign: स्विगीचे सीटीओ डेल वाझ यांनी दिला राजीनामा; त्यांच्या जागी मधुसूदन राव यांची नियुक्ती

स्विगीच्या प्रवक्त्याने पुष्टी केली आहे की डेल वाझ कंपनीपासून वेगळे होत आहेत आणि स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत आहेत.

Swiggy (Photo Credits: PTI)

ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) डेल वाझ यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी सुमारे 5 वर्षे कंपनीला आपली सेवा दिली आहे. अॅमेझॉनमध्ये 11 वर्षे घालवल्यानंतर डेल वाझ स्विगीमध्ये सामील झाले होते. त्यांच्या जागी आता ही जबाबदारी मधुसूदन राव यांच्याकडे देण्यात येणार आहे. मधुसूदन राव जवळपास 4 वर्षांपासून कंपनीशी संबंधित आहेत. राव सध्या स्विगी येथे कंझ्युमरटेक आणि फिनटेक (इंजिनिअरिंग आणि प्रॉडक्ट) चे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. डेल वाझ पुढील महिन्यापर्यंत कंपनीसोबत राहतील. स्विगीच्या प्रवक्त्याने पुष्टी केली आहे की डेल वाझ कंपनीपासून वेगळे होत आहेत आणि स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement