2 Cr Compensation For Bad Haircut: चुकीच्या हेअरकटबद्दल NCDRC ने दिलेल्या 2 कोटी नुकसानभरपाईच्या आदेशाला सर्वोच्च न्यायलयाची स्थगिती

सर्वोच्च न्यायालाने (Supreme Court) राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या (NCDRC) आदेशाला एका प्रकरणात बुधवारी (17 मे) स्थगिती दिली. केस चुकीच्या पद्धतीने कापल्याचा आरोप करत एका मॉडेलने दाखल केलेल्या प्रकरणात एसीडीआरसीने ITC मौर्या हॉटेल [ITC Limited vs Aashna Roy] हॉटेला तब्बल 2 कोटी रुपये नुकसानभरपाईपोटी सदर मॉडेलला देण्याचे आदेश दिले होते.

Supreme Court

सर्वोच्च न्यायालाने (Supreme Court) राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या (NCDRC) आदेशाला एका प्रकरणात बुधवारी (17 मे) स्थगिती दिली. केस चुकीच्या पद्धतीने कापल्याचा आरोप करत एका मॉडेलने दाखल केलेल्या प्रकरणात एसीडीआरसीने ITC मौर्या हॉटेल [ITC Limited vs Aashna Roy] हॉटेला तब्बल 2 कोटी रुपये नुकसानभरपाईपोटी सदर मॉडेलला देण्याचे आदेश दिले होते. ज्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने एनसीडीआरसी ने दिलेल्या आदेशाला आव्हान देणार्या आयटीसीच्या आपीलवर प्रतिवादी आशना रॉय यांना नोटीस बजाली. सर्वोच्च न्यायालयासमोर या प्रकरणाची ही दुसरी फेरी आहे. सर्वोच्च न्यायालयाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये सप्टेंबर 2021 मध्ये प्रथम देण्यात आलेली नुकसानभरपाईची रक्कम बाजूला ठेवली होती आणि नवीन निर्णयासाठी प्रकरण NDRC कडे पाठवले होते.

एनसीडीआरसीने आपल्या पूर्वीच्या आदेशाला दुजोरा देण्यापूर्वी या प्रकरणाचा नव्याने विचार केला होता. एनसीडीआरसीचा आदेश याचिकाकर्त्याने सादर केलेल्या प्रस्तावित मॉडेलिंग आणि अभिनय कराराच्या ईमेल्स आणि अर्जांवर अवलंबून होता, ज्यामुळे त्याने आधी दिलेल्या रकमेची पुष्टी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now