Swati Maliwal Case: सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव Bibhav Kumar यांना जामीन मंजूर
दिल्ली मध्ये 13 मे ला मालिवाल सोबत बैभव यांनी मुख्यमंत्री निवासातच गैर वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव Bibhav Kumar यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आपच्या राज्यसभा खासदार Swati Maliwal यांच्यासोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली बैभव अटकेत होते. 18 मे पासून ते तुरूंगात होते. 13 मे ला मालिवाल सोबत बैभव यांनी मुख्यमंत्री निवासातच गैर वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कोर्टाने आता कुमार यांच्यावर काही अटी घातल्या आहेत ज्यामध्ये त्यांना आता दिल्लीचे मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित राजकीय कार्यालयाचे पीएस म्हणून काम करता येणार नाही. सर्व साक्षीदार तपासले जात नाही तोपर्यंत कुमार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात प्रवेश नसेल.
Bibhav Kumar यांना जामीन मंजूर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)