NEET Aspirant Suicide Case: कोटा मध्ये 18 वर्षीय 'नीट' च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही मात्र या आत्महत्येमागे प्रेमसंबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Dead | (Photo credit: archived, edited, representative image)

राजस्थानच्या कोटा मध्ये 'नीट' परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. पीजी च्या रुम मध्ये त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळला आहे. मागील दीड वर्षांपासून कोटा येथे NEET-UG ची तयारी करत असलेला विद्यार्थी प्रताप नगरमधील त्याच्या पीजी रूममध्ये राहत होता. दादाबारी पोलिस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्टर मेंगेलाल यादव यांनी सांगितले की, शेजारी राहणाऱ्या एका चुलत भावाला त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. कोणतीही सुसाईड नोट सापडली नसून, यामागे प्रेमसंबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. नक्की वाचा: Mahim Suicide Case: माहीम मध्ये तरूणीची आत्महत्या; 'दोनदा प्रेगंसी मध्ये बॉयफ्रेंड ने जबाबदारी झटकल्याने' उचललं टोकाचं पाऊल .

प्रेमसंबंधांमधून आत्महत्येचा संशय  

Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.Mumbai nightlife

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now