Suicide Attempt on Atal Setu: अटल सेतूवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी चपळाईने वाचवले प्राण (Watch Video)

माहितीनुसार, मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने शुक्रवारी सायंकाळी सातच्या दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रीमा पटेल असे या महिलेचे नाव असून ती मुलुंड येथून कॅब घेऊन अटल सेतूवर आली होती.

Suicide Attempt on Atal Setu

Suicide Attempt on Atal Setu: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल पुलावर गेल्या काही दिवसांत आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता आज पुन्हा एकदा अटल सेतूवर अशी घटना घडली. अटल सेतूवर एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शौर्य दाखवत महिलेचे प्राण वाचवले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या  माहितीनुसार तिने पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला असता, आधी कॅब चालकाने व नंतर पोलिसांनी आपल्या चपळाईने आणि धाडसाने महिलेला वाचवले. याबाबत केलेल्या चौकशीदरम्य वेळीमहिलेने आपल;या निवेदनात सांगितले की, ती काही धार्मिक वस्तूंचे तसेच देवांच्या फोटोंचे विसर्जन करत होती. याआधी जुलै महिन्यातही एका 38 वर्षीय अभियंत्याने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली होती. (हेही वाचा: Suicide By Jumping Off Atal Setu: अटल सेतू वरून उडी मारून 38 वर्षीय तरूणाने संपवलं जीवन; व्हिडिओ होतोय वायरल)

व्हिडिओमधील दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात-

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now