Srinivas Hegde Passes Away: चंद्रयान 1, पहिल्या चांद्रमोहिमेचे संचालक श्रीनिवास हेगडे यांचं निधन

71 वर्षीय हेगडे यांच्यावर किडनीशी निगडित आजारावर उपचार सुरू होते. त्यामध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे.

श्रीनिवास हेगडे | X

चंद्रयान 1, पहिल्या चांद्रमोहिमेचे संचालक श्रीनिवास हेगडे यांचं निधन झालं आहे. 30 वर्षांपेक्षा अधिक काळ हेगडे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये काम करत होते. 2008 मध्ये भारताच्या पहिल्यावहिल्या चंद्रयान 1 या इस्त्रोच्या महत्त्वाच्या मोहिमेत हेडगे यांची भूमिका महत्त्वाची होती. 71 वर्षीय हेगडे यांच्यावर किडनीशी निगडित आजारावर उपचार सुरू होते. त्यामध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement