Tirupati Laddu Controversy: तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात लाडू बनवण्यासाठी वापरले गेले पाम तेल आणि प्राण्यांची चरबी; TDP चा गंभीर आरोप, शेअर केला NABL चाचणी अहवाल
चंद्राबाबू यांनी बुधवारी (18 सप्टेंबर) सांगितले की, गेल्या 5 वर्षांत वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे.
Tirupati Laddu Controversy: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील जगन मोहन सरकारवर तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू (Tirupati Laddu) बनवण्यासाठी बीफ टॅलो, फिश ऑईल, पाम ऑइल आणि प्राण्यांची चरबीचा वापर केल्याचा आरोप केला आहे. चंद्राबाबू यांनी बुधवारी (18 सप्टेंबर) सांगितले की, गेल्या 5 वर्षांत वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. त्यांनी 'अन्नदानम' (मोफत जेवण) च्या गुणवत्तेशी तडजोड केली. तिरुमलाच्या पवित्र लाडूमध्येही तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात असे. मात्र, आता प्रसादात शुद्ध तूप वापरत आहोत. आम्ही तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहोत, असे ते म्हणाले. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत संबोधित करताना नायडू यांनी दावा केला की, तिरुमला येथे निकृष्ट घटकांनी लाडू बनवले जातात.
यानंतर वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी नायडूंवर तिरुमला मंदिराच्या पावित्र्याला हानी पोहोचवल्याचा आरोप केला. रेड्डी यांनी तेलुगूमध्ये X वर लिहिले, ‘चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला आणि कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेला गंभीरपणे हानी पोहोचवली आहे. तिरुमला प्रसाद यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पण्या अत्यंत दुर्भावनापूर्ण आहेत. कोणीही असे शब्द बोलणार नाही किंवा असे आरोप करणार नाही.’ गुजरातमधील राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने एक अहवाल दिला आहे. जगन मोहन सरकारच्या काळात प्रसिद्ध तिरुपती लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीच्या उपस्थितीची पुष्टी या अहवालाने केली आहे. तुपात फिश ऑइल, बीफ फॅट आणि टॅलोचे अंश आढळून आले होते. (हेही वाचा: AP Liquor Policy: स्वस्त दारु योजना; आवडता ब्रँड फक्त 99 रुपयांत; नवे धोरण 1 ऑक्टोबरपासून लागू; तळीरामांनो घ्या जाणून)
तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात लाडू बनवण्यासाठी पाम तेल आणि प्राण्यांची चरबी वापरल्याचा टीडीपीचा आरोप-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)