SPG संचालक अरुण कुमार सिन्हा यांचे निधन, यकृताच्या समस्येवर सुरु होते उपचार
SPG देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळते. अरुण कुमार सिन्हा हे 1988 चे केरळ केडरचे IPS अधिकारी आहेत. त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.
विशेष संरक्षण दलाचे (SPG) संचालक अरुण कुमार सिन्हा यांचे बुधवारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात निधन झाले. यकृताच्या समस्येमुळे त्यांना 4 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 61 वर्षांचे होते.
SPG देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळते. अरुण कुमार सिन्हा हे 1988 चे केरळ केडरचे IPS अधिकारी आहेत. त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. अरुण कुमार सिन्हा हे 2016 पासून एसपीजी प्रमुख म्हणून तैनात होते.
1985 मध्ये स्थापन झालेली SPG ही एक एलिट फोर्स आहे ज्यावर विशेषत: देशाच्या विद्यमान आणि माजी पंतप्रधानांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम दिले जाते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 मध्ये त्याची स्थापना झाली होती.
पाहा ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)