Sonia Gandhi यांनी राजस्थानमधून भरला राज्यसभा उमेदवारी अर्ज

या वेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा, अशोक गेहलोत आणि गोविंद सिंग दोतसरा उपस्थित होते.

Sonia Gandhi (Photo Courtesy: ANI/X)

काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थान येथून राज्यसभेसाठी निवडणूक अर्ज दाखल केला आहे. या वेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा, अशोक गेहलोत आणि गोविंद सिंग दोतसरा उपस्थित होते. राजस्थान राज्यातील पक्षीय बलाबल आणि मतांची संख्या पाहता काँग्रेस एकूण तीन जागांपैकी एक उमेदवार आरामात निवडूण आणू शकतो. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह राज्यसभेवीरील सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने निवृत्त होत आहेत. त्यामुळे राजस्थानातून एक जागा रिक्त होत आहे. त्याच जागी सोनिया गांधी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राज्यसभा निवडणूक 2024 मध्ये 15 राज्यांतून वरिष्ठ सभागृहाच्या एकूण 56 खासदार निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. निवडणूक अर्ज दाखलकरण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी असणार आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)