Kiren Rijiju on Judges: काही निवृत्त न्यायाधीश भारत विरोधी टोळीचा भाग - किरेन रिजिजू

जे न्यायव्यवस्थेला वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षांप्रमाणेच सरकारच्या विरोधात काम करतात. यावेळी देशाच्या विरोधात कोणीही असेल त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल असे देखील किरेन रिजिजू यांनी म्हटले.

Kiren Rijiju (Photo Credits: IANS)

काही निवृत्त न्यायाधीश आणि एक्टिव्हीस्ट आहेत जे भारतविरोधी टोळीचा भाग आहेत जे न्यायपालिका सरकारच्या विरोधात वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि जे देशाच्या विरोधात आहेत त्यांना किंमत मोजावी लागेल, असे केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. कायदा मंत्री इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023 मध्ये प्रश्नांची उत्तरे देत होते जेव्हा त्यांनी न्यायाधीशांच्या उत्तरदायित्वावर नुकत्याच आयोजित केलेल्या चर्चासत्रावर भाष्य केले.

अलिकडेच न्यायाधीशांच्या उत्तरदायित्वावर एक परिसंवाद झाला. पण एकप्रकारे संपूर्ण चर्चासत्र न्यायव्यवस्थेवर कसा प्रभाव पाडत आहे याबद्दल बनला होता. असे काही न्यायाधीश आहेत जे भारतविरोधी टोळीचा भाग आहेत. जे न्यायव्यवस्थेला वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षांप्रमाणेच सरकारच्या विरोधात काम करतात. यावेळी देशाच्या विरोधात कोणीही असेल त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल असे देखील किरेन रिजिजू यांनी म्हटले.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now