Snake Attack in Karnataka Video: घराच्या दारात पडून असलेल्या सापाच्या हल्ल्यापासून थोडक्यात बचावली लहान मुलगी; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ (Watch)

आश्चर्य म्हणजे त्यानंतर सापही मुलीपासून दूर जातो. अक्षरशः अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Snake Attack in Karnataka Video

कर्नाटकातील बेळगावी येथे एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. इथे एक लहान मुलगी सापाच्या हल्ल्यातून चमत्कारीकरित्या बचावली आहे. हलगा येथील सुहास साईबन्नवर यांच्या घरी ही घटना घडली. ही संपूर्ण घटना घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये साप घराच्या मुख्य दरवाजाकडे सरपटत जाताना दिसत आहे. त्यानंतर तो काही वेळ दाराबाहेर शांतपणे पडून राहतो, इतक्यात एक लहान मुलगी दाराकडे येते. दारात साप आहे याबाबत मुलगी पूर्णतः अनभिज्ञ आहे. मात्र त्यानंतर तिची नजर दाराजवळील सापावर पडते व ती लगेच दूर जाते. आश्चर्य म्हणजे त्यानंतर सापही मुलीपासून दूर जातो. अक्षरशः अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर सर्पतज्ज्ञ रामा पाटील यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आणि सापाला यशस्वीपणे पकडले गेले. (हेही वाचा: Man Kiss King Cobra: माणसाने घेतले किंग कोब्राचे चुंबन)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)