Smallest Washing Machine: भारतीय तरुणाने बनवली जगातील सर्वात लहान वॉशिंग मशीन; आकार केवळ 1.5 इंच, Guinness World Records मध्ये नोंद

साजी म्हणाला की, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा भाग होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने हे मशीन बनवले आहे. हे मशीन कोणत्याही सामान्य मोठ्या मशीनप्रमाणे काम करते आणि त्यात कपडे देखील धुता येतात.

Smallest Washing Machine

Smallest Washing Machine: भारताच्या सेबिन साजी याने जगातील सर्वात लहान वॉशिंग मशीन बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे. हे यंत्र इतके लहान आहे की, ते आपल्या मुठीतही बसू शकते. केरळमधील कांजिरापल्ली येथील रहिवासी असलेल्या साजीने बनवलेले हे यंत्र केवळ 1.28 इंच लांब, 1.32 इंच रुंद आणि 1.52 इंच उंच आहे. त्याचे वजन फक्त 25 ग्रॅम आहे, जे एखाद्या कुकीपेक्षा किंचित जास्त आहे. साजी म्हणाला की, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा भाग होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने हे मशीन बनवले आहे. हे मशीन कोणत्याही सामान्य मोठ्या मशीनप्रमाणे काम करते आणि त्यात कपडे देखील धुता येतात.

जरी हे छोटे वॉशिंग मशिन सामान्य वापरासाठी व्यावहारिक नसले तरी, याने सूक्ष्म अभियांत्रिकीच्या अनंत शक्यता उघड केल्या आहेत. याआधी जगातील सर्वात लहान व्हॅक्यूम क्लिनर देखील भारतात बनवण्यात आले होते, ज्याचा आकार फक्त 0.65 इंच होता. याआधी आंध्र प्रदेशच्या साई तिरुमलानिधी यांनी जगातील सर्वात लहान वॉशिंग मशीन बनवले होते. 17 जून 2023 रोजी त्याने हा विक्रम केला होता. या मशीनचा आकार 37 मिमीx 41 मिमीx 43 मिमी होता. (हेही वाचा: World’s largest iPhone: जगातील सर्वात मोठा आयफोन, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; भारतीय वंशाच्या ब्रिटीश यूट्यूबरची कमाल)

Smallest Washing Machine-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now