Sikar Bus accident: राजस्थानच्या सीकरमध्ये भीषण बस अपघात; 12 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर
माहितीनुसार, अपघाताचे कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, पोलीस त्यांच्या कारणांचा शोध घेत आहेत.
Sikar Bus accident: राजस्थानमधील सीकरमध्ये भीषण अपघात झाला आहे. सालासरकडून येणारी बस कल्व्हर्टला धडकली व यामुळे झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. लक्ष्मणगढजवळ हा अपघात झाला. यामध्ये 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना लक्ष्मणगड रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, लक्ष्मणगड येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सालासरकडून येणारी खासगी बस नियंत्रणाबाहेर जाऊन पुलावर आदळल्याची घटना घडली. पुलाच्या भिंतीला धडकल्याने बसचे मोठे नुकसान झाले. बसच्या संपूर्ण बाजूचा चक्काचूर झाला व यानंतर बसमध्ये गोंधळ उडाला.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अपघातावर शोक व्यक्त करत जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माहितीनुसार, अपघाताचे कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, पोलीस त्यांच्या कारणांचा शोध घेत आहेत. माहिती मिळताच सीकरचे खासदार अमरा राम, जिल्हाधिकारी मुकुल शर्मा, एसपी भवनभूषण यादव, सिटी डीएसपी (आयपीएस) शाहीन सी आणि एडीएम रतन कुमार घटनास्थळी पोहोचले. (हेही वाचा: Telangana Shocker: झोपेत मोबाईलच्या चार्जिंग वायरला स्पर्श केला अन् जीव गमावला; विजेचा धक्का बसल्याने मृत्यू)
राजस्थानच्या सीकरमध्ये भीषण बस अपघात-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)