Shiv Sena Vardhapan Din: शिवसेना वर्धापन दिनी पहा बाळासाहेब ठाकरे यांची गाजलेली भाषणं!

बाळ केशव ठाकरे यांनी 1966 साली मुंबई मध्ये शिवसेनेची स्थापना केली. सध्या या पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे.

Balasaheb Thackeray | (File Image)

महाराष्ट्रात भूमीपुत्रांच्या न्याय्य व हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याकरिता बाळ केशव ठाकरे यांनी 'शिवसेना' या राजकीय पक्षाची 56 वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रचली. 19 जून  1966 साली शिवसेना अस्तित्त्वात आली. पुढे बाळ ठाकरे हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे झाले. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू शकता किंवा त्यांचा राग करू शकता पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही अशा स्वभावांच्या व्यक्तींपैकी एक बाळासाहेब ठाकरे होते. सक्रिय राजकारणापासून दूर असूनही अगदी सामान्य माणसापासून बडे राजकारणी, सेलिब्रिटी, खेळाडू, उद्योजक, कलाकार यांच्यापर्यंत सार्‍यांवर बाळासाहेबांचं गारूड होतं आणि आजही आहे. बारीक अंगकाठी पण ओघवती वकृत्त्वशैली, भाषेवरील प्रभुत्त्व आणि जनसामान्यांची नस ओळखणारा नेता म्हणून त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी व्हायची. आज सेनेच्या वर्धापन दिनी  बाळासाहेबांच्या दमदार आणि गाजलेल्या काही भाषणांची एक झलक नक्की पहा!

बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement