Sharad Yadav Passes Away: माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन

कन्या सुभाषिनी शरद यादव यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर या ज्येष्ठ राजकारण्याच्या निधनाची माहिती दिली आहे.

Sharad Yadav

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ राजकारणी शरद यादव यांचे निधन झाले आहे. शरद यादव यांच्या निधनाला त्यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनी दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद यादव यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

कन्या सुभाषिनी शरद यादव यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर या ज्येष्ठ राजकारण्याच्या निधनाची माहिती दिली आहे. शरद यादव जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्षही होते. देशातील समाजवादी नेते म्हणून त्यांची गणना होते. नितीश कुमार यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांनी पक्ष सोडला होता. बिहारच्या मधेपुरा मतदारसंघातून ते अनेकदा खासदार झाले होते. शरद यादव यांच्या निधनावर अनेक राजकारण्यांनी शोक व्यक्त केला आहे. शरद यादव यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि नंतर बिहारमध्ये राजकीय वर्चस्व दाखवून राष्ट्रीय राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले.