Covid 19 in India: सीरम इन्स्टिट्यूटने पुन्हा सुरु केले Covishield लसींचे उत्पादन; येत्या 90 दिवसांत उपलब्ध होतील 6-7 दशलक्ष डोस- Adar Poonawalla

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 7,830 नवीन रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी देशभरात 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Coronavirus Vaccine Covishield (Photo Credits: Adar Poonawalla's Twitter)

सध्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसत आहे. अनेक महिन्यांपासून कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होत होते, मात्र गेल्या काही आठवड्यांपासून त्यात वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 7,830 नवीन रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी देशभरात 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच वेळी, संसर्ग दर देखील 3.65 टक्क्यांवर आला आहे. आता माहिती मिळत आहे की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसींचे उत्पादन पुन्हा सुरू केले आहे. येत्या 90 दिवसांत साधारण 6-7 दशलक्ष डोस उपलब्ध होतील, असे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले. (हेही वाचा: COVID 19 In India: भारतामध्ये सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 40,215; मागील 24 तासांत समोर आले 7,830 नवे रूग्ण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now