Savitribai Phule Jayanti 2022: उपमुख्यमंत्री Ajit Pawar ते Balasaheb Thorat यांनी ‘महिला शिक्षण दिना’च्या दिल्या ट्वीट द्वारा शुभेच्छा!
महाराष्ट्रात क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, 3 जानेवारी हा महिला शिक्षण दिन आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्रात क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, 3 जानेवारी हा महिला शिक्षण दिन आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत महिलांना, बालिकांना शुभेच्छा देत त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले जातं. महिला आणि मुलींनीही शिक्षणं घ्यावं यासाठी या निमित्ताने समाजात सजगता निर्माण केली जाते.
सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव (जि.सातारा) येथील त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांचे अभिवादन. राज्यातील जनतेला ‘महिला शिक्षण दिना’च्या उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/hsR9Bghf9r
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 3, 2022
सातारा मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथील त्यांच्या स्मारकाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत पुष्पहार अर्पण करून राज्यातील जनतेला ‘महिला शिक्षण दिना’च्या उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
बाळासाहेब थोरात
अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!#सावित्रीबाईफुले pic.twitter.com/UtfQxvVGnB
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 3, 2022
केंद्रीयमंत्री भारती पवार
शिक्षणाच्या मशालीने देशातील महिलांना प्रगतीची वाट दाखविणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! pic.twitter.com/ENM7h09sTo
— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatippawar) January 3, 2022
शालिनी ठाकरे
अनंत अडचणींवर मात करून भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारताच्या पहिल्या शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!#SavitribaiPhule pic.twitter.com/YsmMINvcSZ
— Shalini Thackeray (@ThakareShalini) January 3, 2022
डॉ.नितीन राऊत
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, थोर समाजसेविका, थोर साहित्यिक, कवयित्री क्रांतीज्योती #सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.@INCMaharashtra pic.twitter.com/thHlqN7TKW
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) January 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2022 10:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

